ए.के.हंगल
A.K Hangal is not only a Veteran Actor but also A Freedom Fighter and An Activist.His book Life and Times of A.K.Hangal in English…

“ए.के.हंगल माझ्या आठवणी” हे त्यांचं आत्मचरित्र मराठीत भाषांतरित आहे.त्यांनी हे पुस्तक, “जातीय ऐक्य आणि शांतता यासाठी ज्यांनी आपली आयुष्यं झोकून दिली, त्या सर्वांच्या स्मृतीला” अर्पण केले आहे.या त्यांच्या पुस्तकातील अर्पण पत्रिकावरून त्यांची वैचारिक बाजू लगेच लक्षात येयाला काहीच अडचण येत नाही.
ए.के. हंगल हे मुळचे कश्मिरी पंडीत.त्यांचे पूर्ण नाव (पंडित) अवतार कृष्ण हंगल.हंगल म्हणजे काश्मिरी भाषेत हरीण, काळवीट.त्यांच्या पूर्वजांनी बरेच शतक आधीच काश्मिरवरुन लखनौला स्थलांतरित झाले होते आणि ए.के.हंगल यांचे घर लखनौ सोडून पेशावर येथे दीडशे वर्षांपूर्वी गेले होते.यांचे आजोबा पेशावर येथे असिस्टंट कमिशनर होते.तसेच आजोबाचे थोरले चुलतभाऊ भारतीय वंशाचे बंगाल हायकोर्टाचे पहिले न्यायाधीश होते.त्यांचे नाव जस्टिस शंभुनाथ पंडित होते.ए.के.हंगल यांचे वडील पंडित हरी किशन हंगल हेही सरकारी नवकरदार होते.ए.के.हंगल हे सगळ्यात लहान होते, त्यांच्यापेक्षा दोन मोठ्या बहिणी होत्या.त्यांच्या आईचा ते खूप लहान असतानेच मृत्यू झाला.त्यांना कृष्णा कुमारी या मोठ्या बहिणीने वाढवलं.
ए.के.हंगल यांचं प्राथमिक शिक्षण पेशावर येथे झालं.ते म्हणतात की, “शाळेत आम्ही ब्रिटिश सत्तेची स्तुती करणारी गाणी गायचो.” भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात येऊ नाही म्हणून व्हाइसरायला दयेचा अर्ज देण्यात येणार होता आणि त्या अर्जावर सह्या गोळा करत होते, त्यावर ऐ.के.हंगल यांनीही सही केली होती.परंतु त्या तिघांनाही फासी झाली.देशभरात अनेक निषेध मोर्चे निघाले, त्या मोर्चात ऐ.के.हंगल ही सहभागी होत असत.आशा मोर्चात झालेल्या गोळाबारातून/ हिंसाचारातून दोन वेळा मरता–मरता वाचले होते.गोळीतून निघणार्या छर्यांपासून ते गंभीर जखमी झाले होते.
ए.के.हंगल यांनी वडील-आजोबा सारखी ब्रिटीश सरकारी नोकरी केली नाही, त्यांनी ती नाकारली आणि वैचारीक मंथनातून त्यांच्यावर कम्युनिष्ट विचीरसरणीचा प्रभाव पडला आणि ते कम्युनिष्ट झाले, कायमस्वरुपी.परंतु काहीतरी काम करणं महत्वाचं होतं, म्हणून त्यांच्या वडिलांचा मित्राच्या सल्ला ऐकून शिवणकाम शिकले. ते शिंपू/ टेलर झाले.याच काळात त्यांनी रंगभूमीवर काम केले तसेच रेडिओसाठी गायन ही त्यांनी केले होते.
ए.के.हंगल वडिलांच्या निवृत्ती नंतर पेशावर सोडले आणि ते कराची येथे गेले.कराचीत मेवण्याच्या मदतीनं ते स्थीर झाले.एका कपड्याच्या व्यापार्याकडे मुख्य कटर म्हणून काम करत होते.त्याच बरोबर ते कामगारांच्या हक्कांसाठी चळवळ उभी करत होते.त्यातूनच त्यांना कामावरून काढण्यात आले.ते परत कराची येथेही रंगभूमीकडे वळले.तसेच कराचीतील कॉलेजची मुले नाटकाचे दिग्दर्शन करायला बोलवले जायचे.तसेच त्यांनी कराची रेडिओसाठी संगीत नाटक केले होते.
भारताची फाळणी झाली होती.त्यांनी हिंदू म्हणून भारताची निवड केली नव्हती.कदाचित ती त्यांची जन्मभूमी होती किंवा ते एका विचारसरणीने प्रभावित होते आणि म्हणूनच त्यांना भारत काय नि पाकिस्तान काय याचा फरक पडला नसावा. कार्यकर्ता म्हणून ए.के.हंगल पाकिस्तान येथे चळवळीचं काम करतच होते, ते करत असताना, नाटकाचा उपयोग लोकांची राजकीय जागृती करण्यासाठी केला जावा, असे त्यांना वाटत होते.अशाप्रकारची संस्था इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन – इफ्टा नावाची नाट्यसंस्था होती.ती भारतात होती.त्या संस्थेच्या वार्षिक सभेला ए.के.हंगल १९४७ मध्ये अहमदाबाद येथे आले आणि ते खुपच प्रभावित झाले.परतीच्या प्रवासात त्यांच्या डोक्यात घोळत होते की, भारतातील इफ्टा सारखी नाट्यसंस्था ते पाकिस्तानमध्ये पिप्टा– पाकिस्तान पिपल्स थिएटर असोसियशन या नावाने काढावी वगैरे… परंतु भलतच घडलं.हिंदू-मुसलमान-सिख दंगे दोन्ही देशात मोठ्या प्रमानात घडू लागले.पाकिस्तानमध्ये ए.के.हंगल यांना अटक झाली.त्यांना एक हिंदू म्हणून पाकिस्तान सोडून भारतात जाण्यास सांगितले गेले; परंतु त्यांनी त्यास नकार दिला.त्यांची सुटका होणे शक्य नव्हती, जोपर्यंत ते भारतात जाण्यास तयार होत नाहीत तो पर्यंत.शेवटी त्यांना भारतात एक हिंदू म्हणून यावे लागले.
ए.के.हंगल हे आपली पत्नी मनोरमा आणि ९ वर्षाचा मुलगा विजयला घेऊन कराचीवरून मुंबईला आले.आता पाकिस्तानवरून आलेले ते एक निर्वासित होते.भारत–पाकिस्तान फाळणी झाल्यापासून जवळ-जवळ २ वर्षे ३ महिने झाल्यास ते भारतात आले होते, त्यामुळे त्यांना बर्याच अडचणी येत होत्या.त्यांच्या मित्रांनी त्यांना शक्य तेवढे सहकार्य केले होते.शेवटी शिंपीच्या कलेने त्यांना स्थीर केलं.ते मुख्य कटर म्हणुन काम करू लागले.मुंबईतील परळच्या चाळीत ते १५ वर्षे राहिले होते.
भारतातही ते चळवळीत सक्रिय झाले. इप्टाचे त्यांना आकर्षण होतेच.ते इप्टाच्या शोधात होते, परंतु इप्टानेच त्यांना शोधले आणि ते इप्टाचे अविभाज्य भाग झाले.त्यांची त्या संघटनेशी संबधीत बर्याच सदस्यांची भेटी व मैत्री झाली. उदा.महाराष्ट्रातील अमर शेख आणि आण्णा भाऊ साठे… तसेच हिंदी आणि प्रादेशिक नाटक-चित्रपटातील कलाकारांबरोबरही मैत्री झाली आणि ते नाटकासह चित्रपटातही काम करू लागले. ए.के.हंगल आणि पत्नी मनोरमा यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता.
त्यांना चित्रपटापेक्षा नाटकात रमायला जास्त आवडत होतं.चित्रपट माध्यमात अनेक वर्षे जवळ-जवळ २०० चित्रपटात काम करुनही त्यांना उपरेपणा वाटत असे.त्यांनी हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक चित्रपटातून उतार वयात बरंच काम केलं, कारण ते या क्षेत्रात खूप उशीरा आले होते.
ए.के.हंगल हे आपले सहकारी, नाटक- चित्रपट, सहकलाकार, दिग्दर्शक, गायक लोककलाकार, चळवळ, समाजकारण- राजकारण इत्यादी विषयी लिहितात.तसेच ते देश-विदेशातील भटकंतीही बाबत सांगतात.
ए.के.हंगल हे भारत-पाकिस्तान कौन्सिलचे उपाध्यक्ष होते.पाकिस्तान दिन निमत्त त्यांना निमंत्रन मिळालं, त्यांनी ते स्विकारलं.मुंबईच्या प्रेसिडेंट हॉटेलमध्ये होणार्या या समारंभाला हाजर राहीले आणि त्यांच्या चित्रपटावर एका मोठ्या राजकीय पक्षाने २ वर्षे बहिष्कार टाकला.या काळात त्यांना कम मिळत नव्हतं.ज्या चित्रपटांचे शुटिंग झाले होते, त्यांचे दृष्य, संकलनामार्फत काढून टाकले जात होते.त्याच काळात त्यांच्या सूनाचे आणि पत्नीचे निधन झाले.ए.के.हंगल यांची शेवटची इच्छा होती की, जन्मभूमी-पाकिस्तानला शेवटची भेट द्यावी…, परंतु ती इच्छाच राहिली.ही सल त्यांना कायम राहिली.
ए.के.हंगल, शेवटी त्यांच्या आत्मचरित्रात लिहितात, भारताचं भविष्य! – “चित्रपटगृह आणि क्रिकेटच्या खेळपटट्यांवरची हुल्लडबाजी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार, खेळाडू यांना फोनवरून येणार्या धमक्या, अल्पसंख्यांकांवर आणि त्यांच्या मालमत्तेवर होणारे हल्ले… बुध्दीजीवी वर्गाला आता प्रत्यक्ष कृती करायचीच वेळ आलीय. अन्यथा खूप उशीर झालेला असेल.स्वातंत्र्य सैनिकांनी यासाठी आपल्या आयुष्याचं बलिदान केलं नाही!”
पंडित अवतार कृष्ण हंगल म्हणजेच ए.के.हंगल होय.हे तेच हंगल आहेत ज्यांनी भगत सिंग यांना फासी होऊ नाही म्हणून दयेच्या अर्जावर सही केली होती, ब्रिटीश सरकारी नोकरी नाकारली होती, इंग्रजांच्या डमडमच्या गोळीचे छरे लागून मरण जवळून पाहीलेलं, ज्यांनी धर्माला नाही तर जन्मभूमीला निवडले; परंतु शेवटी भारतात यावेच लागले.आणि भारतात आल्यास ही इफ्टा संस्था, नाटक-चित्रपट आणि चळवळीला हातचे न राखता महत्वपूर्ण योगदान दिले, ते हेच ए.के.हंगल होय.आणि आजूनही कोणाच्या डोळ्या समोर त्यांचा चेहरा येत नसेल तर ते शोले चित्रपटातील आंधळा सच्चा मुसलमान चाचा, हेच ज्याचा एकूणता एक मुलगा मारला जातो आणि तो गावासाठी एकाच मुलाचं बलिदान देता आलं, याचं असमाधान व्यक्त करतो…

Book Link-https://www.bookganga.com/eBooks/B/428O8
Life and Times of A.K.Hangal
