Hero of The Nation श्याम बेनेगल
समांतर चित्रपट चळवळीचे प्रणेते… ‘हिरो ऑफ द नेशन’, श्याम बेनेगल.
Sham Bengal is known as a hero of the nation.He inspired so many film makers.
हिरो ऑफ द नेशन- श्याम बेनेगल
Hero of the Nation Mr.Sham Bengal.Parallel Cinema Maker.We can find mor information about him in Dr.Savita Nayak Mohite’s Marathi book- Sham Benegal.
समांतर चित्रपट चळवळीचे प्रणेते…
‘हिरो ऑफ द नेशन’, श्याम बेनेगल,
शाम बेनेगल यांचा जन्म स्वतंत्र्यपूर्व काळात, १४ डिसेंबर १९३४ साली हैद्राबादचा, म्हणजेच निजामकालीन.त्यामुळेच कदाचीत दख्खन भाषेचा व संस्कृतीचा प्रभाव त्यांच्या अनेक चित्रपटांवर दिसतो.
‘पाथेर पांचाली’-१९५५ सत्यजीत राय यांचा पहिला चित्रपट पाहून, श्याम बेनेगल खूपच प्रभावीत झाले होते.त्या चित्रपटाने त्यांना दिशा दिली.चित्रपट करायचे, परंतु मनोरंजनात्मक चित्रपट न करता वास्तवादी चित्रपटच कारायचे हे त्यांनी निश्चित केले.ते १९५९ ला मुंबईला गेले, गुरुदत्तला भेटले, त्यांचा सल्ला घेतला.त्यांनी ठरवलेल्या दिशेने प्रवास चालू झाला.
जाहिराती आणि माहितीपटातून त्यांनी नाव मिळवलं व अखेर १२ वर्षाच्या प्रदीर्घ काळा नंतर त्यांचा पहिला चित्रपट- अंकूर-१९७४ हा मोठ्या कष्टाने बनला आणि समांतर चित्रपटांचा अंकूर फुलला.त्यानंतर निशांत-१९७५, मंथन-१९७६ आणि भूमिका-१९७७ सारख्या चित्रपटातून सत्यजीत राय नंतर भारतीय चित्रपट त्यांनी जगभर पोहोचवला.अनेक राष्ट्रीय- आंतराष्टीय पुरस्कार मिळवले.
ज्या प्रमाणे श्याम बेनेगल, सत्यजीत राय यांचा चित्रपट पाहून प्रभावीत झाले होते, त्याच प्रमाणे अनेक दिग्दर्शक- कलाकार त्यांचे चित्रपट पाहून प्रभावीत झाले.त्यात महत्वाचा कलाकार म्हणजे नसीरुद्दीन शहा हे एक होय, ते म्हणतात, मी अंकूर पाहिल्या नंतर खूपच प्रभावीत झालो; कारण मला अशाच प्रकारच्या चित्रपटात काम करायचे होते.आणि योगायोगाने त्यांना पहिली संधीही श्याम बेनेगल यांच्याकडूनच मिळाली, निशांत या चित्रपटात.
त्यांनी ऐतिहासीक मालिकाही केल्या.पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले पुस्तकावर ‘भारत- एक खोज’ याच नावाने १९८८ साली तर २०१४ मध्ये ‘संविधान’ ही एक तासाचा एक भाग असलेले एकूण १० भाग बनवले आहेत.त्यात संविधान निर्मितीची प्रक्रिया रंजक पध्दतीने उलगडून सांगितली आहे.त्यांनी नेहमी एक खंत वाटायाची की, इतर देशांच्या शालेय शिक्षणात त्यांच्या संविधाना बदल माहिती दिली जाते; परंतु आपल्या देशात तसं होत नाही! ती कमी भरुन काडण्याचं काम संविधान ही मालिका करते.तसेच त्यांनी यात्रा, कथा सागर, अमरावती की कथाये आणि संक्राती सारख्या मालिका दुरदर्शनसाठी केल्या आहेत.काही लघुपट, बरेचसे माहितीपट केले आहेत.
श्याम बेनेगल यांनी त्यांच्या चित्रपटातून अनेक कलाकारांना घडवले आहेत.ज्यांचा दबदबा भारतीय समांतर चित्रपटावर जेवढा राहिला तेवढाच मुख्य धारेतल्या चित्रपटावरही राहिला.उदा.स्मिता पाटील, शबाना आझमी, नसीरुद्दीन शहा, ओम पुरी, गिरीश कर्नाड, मोहन आगासे इ…
श्याम बेनेगल अत्यंत संवेदनशील दिग्दर्शक.ते म्हणतात, ‘माझ्या आतली खळबळ मी चित्रपटाचे माध्यम वापरून मांडत गेलो’.त्यांना जगभरातील चित्रपटांचा आभ्यास होता.त्यांना साहित्याचा आभ्यास होता.ते कोणत्याही विषयावर आभ्यासपूर्ण बोलत असे.आणि ते ऐकण्याचा मोह सगळ्यांना होत.ते एक जीवंत विद्यापीठ होते, असे त्यांचे सहकारी- कलाकार सांगतात.
त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार तसेच कलामहर्षी बाबुराव पेंटर जीवनगौरव पुरस्कार, चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार इ… आपल्या देशात मिळालेच आहेत; परंतु रशियानेही त्यांना ‘हिरो ऑफ द नेशन’ हा पुरस्कार बहाल केला आहे.
श्याम बेनेगल यांचा पहिला चित्रपट ‘अंकूर’-१९७४ व शेवटचा चित्रपट ‘मुजिब: द मेकिंग ऑफ नेशन’- २०२३… वयाच्या जवळपास ९० वर्षापर्यंत ते सतत अपडेट राहून काम करत राहिले.त्यांचे काही महत्वाचे चित्रपट- अंकूर-१९७४, निशांत-१९७५, मंथन-१९७६, भूमिका-१९७७, आरोहण-१९८२, मंडी-१९८३, सुसमन-१९८७, सूरज का सातवा घोडा-१९९२, मम्मो-१९९४, सरदारी बेगम-१९९६, द मेकिंग ऑफ द महात्मा-१९९६, समर-१९९९, हरीभरी-२०००, जुबैदा-२००१, नेताजी सुभाषचंद्र बोस-२००४, मुजिब- २०२३…
श्याम बेनेगल हे समांतर चित्रपटाचे प्रणेते होय.तसेच ‘सत्यजीत राय’ यांना ते त्यांचे ‘सच्चे वारसदार’ वाटतात.आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत चित्रपटांना त्यांचं योगदान मिळत राहीलं.२३ डिसेंबर २०२४ मध्ये त्यांचं निधन झालं. आणि मागं ठेवला कित्येक पुढ्यांना पुरेल असा समांतर चित्रपटांचा अनमोल ठेवा…
डॉ.सविता नायक मोहिते यांच्या ‘श्याम बेनेगल- एक व्यक्ती… एक दिग्दर्शक’ हे पहिलेच पुस्तक.या पुस्तकात श्याम बेनेगल यांच्या व्यक्तीमत्वावर चित्रपट, दिग्दर्शक, साहित्य, समाजाचा आणि चळवळींचा प्रभाव व एक दिग्दर्शक म्हणून त्यांचे समांतर चित्रपटातील योगदान तसेच त्यांच्या विषयी सहकारी- कलाकारांचे मते-विचार, त्यांच्या मुलाखतीतून मांडले आहेत.लेखिकेने श्याम बेनेगल यांच्या महत्वाच्या मालिका आणि चित्रपटांचे समिक्षण-विश्लेषण केले आहे.
हिरो ऑफ द नेशन- श्याम बेनेगल
Mr.Sham Benegal- Book Link- https://amzn.in/d/0OrAQLk