Autobiography of Hansa Wadkar a Actress सांगत्ये ऐका
This is an article about legendary actress Hansa Wadkar’s Autobiography- Sangtey Aika- सांगत्ये ऐका Hindi movie Bhumika is made on this book directed by Sham Benegal and leading Smita Patil, Amol Palekar and Amrish Puri…
सांगते ऐका
‘सांगते ऐका’, हंसा वाढकर यांचे आत्मकथन.प्रथम १९६६ च्या माणूस या दिवाळी अंकात मुलाखतीच्या स्वरुपात प्रकाशीत झाले.त्यांची मुलाकात आणि शब्दांकण, अरुण साधू यांनी पार पाडले होते.या आत्मचरित्राची पहिली आवृत्ती फेब्रुवारी १९७० ला राजहंस प्रकाशनने प्रकाशित केली परंतु त्याआधीच हंसा वाडकर यांचा मृत्यू- १९६७ साली झाल्यामुळे, प्रकाशकांना त्यात जास्तीची भर टाकता आली नाही, भर टाकण्यासाठी हंसा वाढकरांचीही तयारी होती.
हंसा वाडकर यांचा जन्म मुंबई येथे २४ जानेवारी १९२३ साली झाला.कलांतराने त्यांचे कुटुंब सावंतवाडीला राहायला गेलं.तेथेच त्यांचं मराठी शाळेत ईयत्ता चौथी पर्यंत शिक्षण झालं. मुलांच्या पुडच्या शिक्षणासाठी, त्यांच कु़टूंब परत मुंबईला आलं.हंसा वाढकर या दुसरी पर्यंत इंग्रजी मीडियममध्ये शिकल्या.घरच्या बिकट परिस्थितीमुळे त्यांना नोकरी करनं भाग होतं म्हणून त्या चित्रपट कंपनीत कामाला लागल्या.वयाच्या दहाव्या वर्षी ‘हिरोईन’ म्हणून ‘विजयाची लग्ने’ या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले; बापूसाहेब पेंढारकर यांची ‘ललितकला कंपनी’ होती तर दिग्दर्शन मामा वरेरकरांनी केले होते.
हंसा वाडकर यांचे खरे नाव ‘रतन साळगावकर’ होते.ते बदलून ‘हंसा वाडकर’ असे मामा वरेरकर यांनी नामकरण केले.कारण त्या काळी चित्रपटात काम करणं कमीपणाचं समजलं जाई.हंसा वाडकर यांची सखी आत्या ‘इंदिरा वाडकर’, चित्रपटात काम करत असत, म्हणून हंसा वाडकर यांना शाळेत असताना मुलं चिडवत.इंदिरा, याही घराच्या इभ्रतीसाठी साळगावकर च्या वाडकर झाल्या होत्या.हंसा वाडकर, यांना भावाच्या शिक्षणासाठी वयाच्या १० व्या वर्षी चित्रपटात काम करावा लागलं, तोच भाऊ तिला साळगावकर हे आडनाव, नावापुढं लाऊ नकोस, नाहीतर मला चिडवतान म्हणून तीला विनंती करतो.तीलाही तोच अनुभव असल्यामूळं ‘रतन साळगावकर’ ची ‘हंसा वाडकर’ होतात.गायणाचे आणि अभिनयाचे धडे त्यांना नानी म्हणजेच त्यांची आजी, वडलांची आईकडूनच मिळाले होते.हंसा वाडकरवर यांच्यात नानीचा खूप जीव होता.
प्रभात, नॅशनल स्टुडिओ, माणिक स्टुडिओ, हिमांशू रॉय यांचा ‘बॉंम्बे टॉकीज’, आणि शांताराम बापू यांच्या ‘राजकमल’ या चित्रपट कंपन्यात त्यांनी अनेक चित्रपट केले.चित्रपट क्षेत्रात त्यांचं नाव झालं होतं.कामाची कमी नव्हती.परंतु त्यांना आई म्हणून ‘चित्रा’ या आपल्या मुलीचे संगोपन करायचे होतं, साधारण गृहणी म्हणून संसार करायचं स्वप्न होतं; परंतु तसं काहीच होत नव्हतं.जगन्नाथ बंदरकर यांच्याशी त्यांचं लग्न झालं होतं, ते त्यांच्यापेक्षा १० वर्षांनी मोठे होते.त्याच्या लग्नामागेपण दोन गोष्टी आहेत, एक म्हणजे बंदरकरांनी, त्या लहान असतानाच, त्यांच्याकडून लग्नाचं वचन घेतलं, त्याही लहान होत्या, मागं किटकीट नको म्हणून त्यांनीही सहज वचन दिलं.दुसरी गोष्ट, त्यांच्या आईला त्या दोघावर संशय येतो, ती हंसा वाडकरला, तो आपल्या जाती-गोतीचा नाही, खालत्या जातीचा आहे वगैरे बोलते.हंसा वाडकरला राग येतो, आमच्यात आसं काहीही नसताना, आई संशय घेते..! तीला संशय येतोयचना तर ठिकय, मग तो खरा करून दाखवायचा आणि बंदरकरांशी लग्न करतात.हाच स्वभाव त्यांच्या आयुष्यात अनेक उलता-पालतीला जबाबदार ठरत होता.ज्या गोष्टीचा संशय घेतला किंवा बोलला की, त्याच्या रागापोटी, तो खरा करण्याचा त्यांचा हट्टी स्वभाव होता, त्यातून त्यांचं नुकसान होत गेलं, असं त्या म्हणतात…
कोणत्याही मुलींनी चित्रपटात काम करण्याच्या विरोधात त्या होत्या.चित्रपटात काम करण्यार्या मुली बिघडतात, असे त्यांचं मत होतं.चित्रपट एक कला आहे परंतु; ते एक व्यसन ही आहे, ते एकदा लागले की ते कधीच सुटत नाही.आणि आयुष्या सूख राहत नाही!
त्या चित्रपट कलेशी कायम प्रमाणीक राहिल्या.त्यांच्या सवयींना, खाजगी आयुष्यातील तान- तणावांना कलेत कधीच आडसर ठरू दिलं नाही त्यांनी.पुढचं पाऊल, संत सखू, राम जोशी आणि मी तुळस तुझ्या अंगणी, या चित्रपटांना त्या, त्यांच्या आयुष्यातील महत्वाचे चार टप्पे मानतात.
हंसा वाडकर यांच्या या आत्मकथनावर श्याम बेनेगल यांनी ‘भूमिका’ नावाचा चित्रपट १९७७ साली बनवला.दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा चौथाच चित्रपट होता.भूमिका हा चित्रपट समांतर चित्रपटांच्या चळवळीतला खूप महत्वाचा चित्रपट गणला जातो.हंसा वाडकर यांची प्रमूख व्यक्तीरेखा ‘स्मिता पाटील’ यांनी तर त्यांच्या नवर्याची- बंदरकर यांची व्यक्तीरेखा तीन चित्रपटातून रोमँटीक सुपर स्टार म्हणूण नावाजलेला हिरो ‘अमोल पालेकर’ यांनी पहिल्यांदाच नकारात्मक/ राखाडी व्यक्तिरेखा साकारली.या चित्रपटासाठी १९७७ साली स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच १९७८ साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीच फिल्मफेअर पुरस्कार.१९७७ साली सर्वोत्कृष्ट पटकथेसाठीही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार तसेच १९७८ साली सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले.
भूमिका हा चित्रपट हंसा वाडकर यांच्या आत्मकथनावर जरी बेतला आसला तरी त्यात दिग्दर्शकाने बरेचसे चित्रपट पुरक बदल केलेले आहेत.या चित्रपटाच्या नायिकाची आई-ती स्वत: आणि तीची मुलगी, असे आई-मुलगी-नात यांचे समान आयुष्य जगणं दाखवले आहे.परंतु हंसा वाडकर यांची मुलगी शिक्षण घेऊन नोकरी करते, असे या आत्मकथनात आहे.
‘भूमिका’ हा चित्रपट एका महिलेच्या आत्मकथनावर आधारीत भारतातील पहिला चित्रपट मानला जातो…
Buy this Book On Amazon- Sangtey Aika- https://www.amazon.in/dp/8174341544?ref_=cm_sw_r_ffobk_cp_ud_dp_WMEPD8ZKJVDHSKMR6J3P
